। पनवेल । वार्ताहर ।
कंटनेर ट्रेलरने दिलेल्या धडकेत मोटारसायकल चालकाचा मृत्यू, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना कळंबोली सर्कल येथे घडली आहे. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी कंटनेर ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.
विमलेश रामअवतार शर्मा (40) असे या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव असून राधेश्याम जगदीश (35) असे जखमीचे नाव आहे. विमलेश आणि राधेश्याम हे दोघे मोटारसायकलवरून जात असताना कळंबोली सर्कल येथे पाठीमागून भरधाव येणार्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान, विमलेश याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी कंटेनर ट्रेलर चालक अजय जाधव (28) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.