दिवेआगरला जाताना कारला अपघात; दोघे गंभीर जखमी

| आंबेत | गणेश म्हाप्रळकर |

पुण्यातील हडपसर येथून श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेश मंदिर असलेल्या दिवेआगर येथे जात असताना एर्टीगा कारला भीषण अपघात झाला. पुणे-दिघी मार्गावर असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील देवघर हद्दीत पहाटे हा अपघात झाला. वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले.

हडपसर येथील पर्यटक एमएच 12 आरपी 8989 या कारने श्रीवर्धन येथे जात होते. यावेळी पहाटे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार देवघर हद्दीत असणाऱ्या मुख्य वळणावर पलटी झाली. यावेळी कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत होते.

यामधील दोघे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार म्हसळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे .,या अपघाताचा पुढील तपास म्हसळा पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे.

Exit mobile version