पत्नी गंभीर जखमी
। म्हसळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील आरावी गावाकडे पनवेलवरून गावी येण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा रस्त्यातच अपघाती मृत्यू झाला. आपल्या गावी भावाच्या उत्तर कार्यासाठी येत असताना म्हसळा शहराजवळच्या जांभूळ गावाजवळ येताच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट आंब्याच्या झाडावर आदळले आणि हा अपघात झाला. या अपघातात नरेश जनार्दन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेवर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






