| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील राजपुरी कोळीवाडा येथे श्री बाळ गणेश वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 84व्या वर्धापन सोहळ्या निमित्ताने दि.19 ते 21 एप्रिल या कालावधीत धार्मिक, सामाजिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.19) अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री 10.00 वाजता, श्रीगुरु माऊली महाराज सावर्डेकर यांचे किर्तन होणार आहे. सोमवारी (दि.20) विनायक चतुर्थीनिमित्त सकाळी साडेदहा वाजता श्रीगुरु माऊली महाराज सावर्डेकर यांचे किर्तन होणार असून दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाआरती, तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे. दुपारी साडेतीन ते रात्री 10.00 यावेळेत श्रींची पालखी मिरवणूक सोहळा रंगणार आहे. मंगळवारी (दि.21) महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता मराठी कव्वालीचा जंगी सामना रंगणार आहे. पुणे येथील राहूल शिंदे आणि उल्हासनगर येथील निशा भगत यांच्यामध्ये कव्वाली होणार आहे. मुरूड तालुक्यातील महादेव कोळी समाज राजपूरी कोळीवाडा आयोजित हा कार्यक्रम श्री बाळ गणेश मैदान राजपूरी कोळीवाडा येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.






