मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार जळून खाक

चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गाडीतील चालकाच्या तत्परतेने प्रवाशी तात्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईहून पुण्याकडे रेनॉल्ड क्विड कार ही चालक अनिल अग्रवाल रा. पुणे हा घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ आला असता कारच्या बोनेट मधून अचानक धूर आल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने त्याने कार बाजूला घेऊन रस्त्याच्या कडेला थांबवली व चालकाने प्रवासी बाहेर काढले, आणि लगेच अचानक कारने पेट घेतला, आयआरबी यंत्रणा अपघातग्रस्त ठिकाणी पोचण्यापूर्वीच कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे, ती कार क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतूक चालू सुरळीतपणे करण्यात आली आहे.

Exit mobile version