| पनवेल | प्रतिनिधी ।
पावसाच्या दमदार हजेरीमुळे पनवेलमधील तक्का परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यावेळी रस्त्यालगतच्या खड्ड्याच्या खोलीचा चालकाला अंदाज न आल्याने एक कार खड्ड्यात अडकली. या घटनेत कारचे मागील दोन्ही टायर हवेत उचलले गेले होते. घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ मदत करत कारमधील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याची कामे अपुरी राहिल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पनवेलमध्ये कार गेली खड्ड्यात
