। पनवेल। वार्ताहर ।
पनवेल जवळील भंगारपाडा, पंकज पार्कींग समोरील जेएनपीटी-पनवेल येथील रोडवर एका कारची कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर पाचजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हर्ष संतोष पाटील (21) रा.नेरुळ हा त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची एक्सयुव्ही ही कार घेऊन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून समोरुन जात असलेल्या एका कंटेनरला पाठीमागून धडक मारुन झालेल्या अपघातात हितेंद्र पाटील (22), श्रीनाथ चंद्रशेखर (22) हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले आहेत. तर चालक हर्ष पाटील यांच्यासह इतर 5 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
कारची कंटेनरला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, पाचजण जखमी

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606