काळसेकर महाविद्यालयात करीअर मार्गदर्शन

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील एन.बी. ए. मानांकित अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल द्वारे नुकतेच 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी करीअर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोनशेहून अधिक विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुर्हान हारीस, संचालक डॉ.अब्दुल रझाक होनुतागी माजी अध्यक्ष सईद मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न या कार्यक्रमात शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जे.आर. निखाडे, वाय. बी.जामनिक, सदफ शेख, अमीर सिवानी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी संवाद करीत करिअरच्या नवनवीन वाटा, पदविका अभ्यासक्रम, त्याची प्रवेश प्रक्रिया, पुढील उपलब्ध संधी आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन करत प्रस्तुत शंकांचे समाधान देखील केले.

3 तास चाललेल्या या कार्यक्रमात मुंबई,नवी मुंबई ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी येथील 70 हून अधिक शाळांतील 10 वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.झहीर आय.काझी, व जनरल सेक्रेटरी जी. ए.आर. शेख प्राचार्य प्रा. रमझान खाटीक यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version