सामुहिक लसीकरणाला प्रतिसाद
पनवेल | प्रतिनिधी |
अंजुमन – ए- इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक मध्ये नुकतीच मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोविड 19 लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली.
मोफत लसीकरण अभियानांतर्गत सुमारे 100 विद्यार्थी,कर्मचारी व सामान्य नागरिकांना कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. मनपा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न या अभियानात वैद्यकीय कर्मचारी डॉ.सरिता महाजन, संजीवनी चोरघे, कविता साळवे यांनी लसीकरण केल. काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो. रमझान खाटीक, प्रशासकीय अधिकारी श्री. आमिर सिवानी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.फेहमिदा सय्यद, श्री. युसुफ मुल्ला आणि संबंधित कर्मचार्यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी,जनरल सेक्रेटरी श्री. जी. ए.आर शेख, अंजुमन-ए-इस्लाम, नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुरहान हारिस,काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रज्जाक होनुटगी आणि काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो.रमझान खाटीक यांचे मौलिक मार्गदर्शन या अभियानाला लाभले.