अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील साहित्यविश्व दिवाळी अंक 2021 या बाराव्या अंकाचे दिमाखदार प्रकाशन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुषार शासकीय विश्रामगृह येथे पार पडले. संपादक सौ प्रमिला जोशी यांनी स्वागत केले. अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनीही शुभेच्छा देत, अंकाचे कौतुक केले. मिस टीन युनिव्हर्स अपूर्वा ठाकुर यांनीही यावेळी अभिमानास्पद वाटत असल्याची भावना व्यक्त केली. माजी नगरसेविका सौ कविता ठाकुर, रिलायन्स समूहाचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, नामांकित वकील प्रसाद पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, साहित्यिक महेश कवळे, फिजिओथेरपिस्ट प्रमोद म्हात्रे, भावेश्री वाळंज, संतोष पेडणेकर, उपेंद्र नारकर, धीरज जोशी, जय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कवळे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश धनावडे यांनी केले.