कारगो कारचा अपघात

| खालापूर | वार्ताहर |

मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर टोलनाक्याच्या पाठीमागे पुणे लेंथवर ईको कारगो (एमएच-04-एलक्यु-1168) चालक जात असताना त्याच्या समोरील वाहन चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे कारगोवरील ताबा सुटल्याने समोरील वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेत कारगो चालकाला गंभीर स्वरुपाच्या दुखापती होऊन कारगो कारचे ही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अमित सावंत हे करीत आहेत.

Exit mobile version