| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई- पुणे जुन्या महामार्गावर खालापूर जवळ दुचाकीने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मुबंई -पुणे महामार्गावर खालापूरहून कार मुबंईकडे जात असताना ती खालापूर फाटा जवळ आली असता समोरील दुचाकी घसरल्याने तिला वाचवण्यासाठी कार चालकाने अचानक ब्रेक मारले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डुक्स दुचाकीने समोरील कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील अक्षय वाघमारे, व जोत्स्ना अक्षय वाघमारे रा. घोडीवलीवाडी, खालापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस आणि अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमीना ऍम्ब्युलन्सने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.