। खांब । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील अपुऱ्या साईडपट्टीचा रस्ता म्हणून बहुचर्चेत असणाऱ्या खांब-पालदाड मार्गावर मालवाहू टेम्पो घसरला. ही घटना बुधवारी (दि. 13) घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगर येथे कोंबड्यांचे खाद्य भरलेला टेम्पो घेऊन टेम्पोचालक खांबवरुन रोहाकडे जात होता. दरम्यान चिन्हे गावाच्या हद्दीत आला असताना समोरून येणाऱ्या वाहनाला पुढे जायला जागा देण्यासाठी टेम्पोचालक आपली गाडी बाजूला घेत होता. यावेळी अपुऱ्या साईडपट्टीमुळे टेम्पो बाजूच्या शेतात कलंडला. सुदैवाने टेम्पोचालक व अन्य टेम्पोमध्ये असणाऱ्या सहप्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. तर टेम्पोमध्ये असणारे कोंबड्यांचे खाद्य चांगल्या पॅकिंग पिशव्यांमध्ये असल्याने खाद्यही सुरक्षित राहिले.
या मार्गावर असणारी अपुरी साईडपट्टी व वाढलेल्या प्रचंड झाडीझुडपांमुळे रोज कुठे ना कुठे तरी छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडतच असतात. तर अपुरी असणारी साईडपट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच सतत वाढत जाणारी वाहतूक व प्रवासी संख्येचा विचार करता हा रस्ता पुरेसा रूंद व पुरेशा साईडपट्टीचा असणे आवश्यक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.







