कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश

रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान

| खोपोली | प्रतिनिधी |

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी खालापूर तालुक्यासह रायगड जिल्हा गुणवत्ता यादीत उल्लेखनीय स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.

यावेळी खोपोलीतील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या इयत्ता पाचवीमधील पार्थ मोरे याने 73.1 टक्के गुणांसह खालापूर तालुक्यात द्वितीय व रायगड जिल्ह्यात 18 वा क्रमांक पटकावला आहे. तर, अब्दुल्लाह किरकिरे (72.4 टक्के) याने तालुक्यात तृतीय, गरिष्मा गाडगीळ (67.7 टक्के) हिने चतुर्थ, शुभ्रा पाटील (66.4 टक्के) हिने पाचवा, ऋषिता राठोड (65.1 टक्के) हिने सहावा, शिवम शेठ (63.0 टक्के) याने सातवा आणि तानिष्का गावडे (58.3 टक्के) हिने नववा क्रमांक मिळवला आहे. तसेच, इयत्ता आठवीमधील संस्कृती सकरे हिने 75.8 टक्के गुणांसह खालापूर तालुक्यात प्रथम आणि रायगड जिल्ह्यात सहावा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. तर, आयू सोनपरोते (55 टक्के) याने तालुक्यात द्वितीय, अभीरा बांद (54.3 टक्के) हिने तृतीय आणि अदिती वानखडे (53.6 टक्के) हिने चतुर्थ क्रमांक मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि पालकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या निकालामुळे कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलने शैक्षणिक क्षेत्रातील आपली उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Exit mobile version