| खोपोली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या वतीने 5 व 6 डिसेंबर दरम्यान जिल्हास्तर बाकेटबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 14-17-19 वयोगटातील मुल- मुलीनी सहभाग घेतला होता. खोपोली कारमेल स्कूलच्या 14 व 17 वर्ष वयोगटातील सर्वच गटात अंतिम फेरीत धडक मारून तीन गटात विजेते तर एक गटात उपविजेते पद पटकावले. शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल मारिया क्रीडा शिक्षक जगदिश मरागजे, जयश्री नेमाने,समीर शिंदे यानी विजेत्याचे कौतुक केले. सर्व विजेते खेळाडूंची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर क्रीडाधिकारी रविंद्र नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांनी उत्तम काम पाहिले