| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव प्रीमिअर लीग 2022 च्या दुसर्या पर्वाची सुरुवात दि.5 ते 11 डिसेंबर दरम्यान निळगुण फाटा येथे अल्ताफदादा धनसे यांच्या भव्य मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत आर.व्ही. फायटर इंदापूर संघाने अंतिम सामन्यात गतवर्षाचे विजेते श्री गणेश स्पोर्ट्स घोटवळ-माणगाव संघाचा पराभव करून प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस रुपये एक लाख व आकर्षक चषक पटकाविला. या संघाला संजय कदम यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मालिकावीरासाठी ठेवण्यात आलेली बाईक व आकर्षक चषकाचा मानकरी शिवांश धियांश उतेखोल-माणगाव संघाचा शुभम शरद जाधव ठरला. त्याने स्पर्धेत फलंदाजी करताना 146 धावा फटकावून गोलंदाजी करताना 12 बळी घेतले. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील 24 संघानी सहभाग घेतला होता.
तर स्पर्धेतील उपविजेते श्री गणेश स्पोर्ट्स घोटवळ – माणगाव संघास रोख रुपये 50 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते शिवांश धियांश उतेखोल -माणगाव संघास रोख रुपये 30 हजार व आकर्षक चषक ,चतुर्थ क्रमांकाचे विजेते विवा स्पोर्ट्स माणगाव संघास रोख रुपये 15 हजार रुपये व आकर्षक चषक,पाचव्या क्रमांकाचे विजेते के.सरकार सुपरस्टार लोणेरे-गोरेगाव संघास 15 हजार रुपये व आकर्षक चषक, सहाव्या क्रमांकाचे विजेते गतवर्षीचे उपविजेते रॅपीडो मोर्बा संघास 15 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वैयक्तिक बक्षिसांमध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून आर.व्ही.फायटर इंदापूर-माणगाव संघाचा आक्रमक शैलीचा फलंदाज योगेश पवार यांची निवड करण्यात येऊन त्यांनी स्पर्धेत 141 धावा फाटकावल्या. त्यांना एल.इ.डी टीव्ही व चषक ,उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आर.व्ही.फायटर लोणेरे-गोरेगाव संघाचा राज राऊत याने स्पर्धेत गोलंदाजी करताना 12 बळी टिपले.त्यांना एल.इ.डी टीव्ही देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून हेमंत शेट्टी,अमर साठे,अमित डोंगरे यांनी पंचाचीभूमिका बजावली. तर समालोचक म्हणून यासीन मर्चंट, जयेश भोसले, हर्षल मुंढे यांनी धावते समालोचन केले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास संजय कदम, दिपक जाधव, संतोष खडतर, सुभाष दळवी, श्रीकृष्ण नावले, अनिल मोरे, प्रताप घोसाळकर, राजू पाटील, गजानन भोईर, सतीश येलकर, राकेश मोरे, चंद्रकांत धोंडगे, सुमित तांदळे, निलेश केसरकर, भाई दसवते, मंगू जाधव, वैभव टेंबे, उपाध्यक्ष नंदुरज वाढवळ, बाळा पोवार, सचिव रोहित रातवडकर, सहसचिव फहद करबेलकर, खजिनदार राहुल बक्कम, सागर पाशिलकर, केदार जाधव, सदस्य निलेश उभारे, मुकुल मेहता, वैष्णव साठे, समीर महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते.