सरकारी निधीतून विकास कामे करतो- पंडित पाटील

। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
आम्ही खिशातून पैसा टाकून विकासकामे करीत नाही. विविध विकासकामासाठी शासनाचा निधी जो असतो तो जनतेचा पैसा आहे. तो विकासकामांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम शेकापक्ष करीत असल्याचे प्रतिपादन पंडीत पाटील यांनी केले. ते कापोली उत्कर्षनगर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कापोली उत्कर्षनगर येथे उदय कळस यांच्या निवासस्थानी शेकाप कार्यकर्त्यांच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, आता कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे बाजुला ठेऊन स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे. यावेळी शेकापमध्ये प्रवेश करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कापोली ग्रामस्थ, माजी अध्यक्ष परशुराम पाटील, परशुराम भायदे, जितेंद्र भायदे, उपसरपंच भायदे यांनी स्मशानभूमी रस्ता, स्वतंत्र कापोली ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजना इत्यादी विकासकामांच्या केलेल्या मागणी बाबत पंडीत पाटील यांनी हिरवा सिग्नल दिला आहे.

Exit mobile version