प्रकरणी एकजण गजाआड
। पनवेल । वार्ताहर ।
विना परवाना अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याप्रकरणी तळोजा पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले आहे. एक इसम तळोजा नावडे ब्रीजखालील कच्च्या रोडवर अग्नीशस्त्र घेवून येणार असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे सपोनि विजय पवार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळताच त्यांनी पो.नि.संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पवार, पो.हवा. नैनेश पाटील, पो.ना.विजय पाटील, पो.ना.शंकर शिंदे, पो.शि.अनिल जाधव, पो.शि.स्वप्नील पाटील, पो.शि.संदेश उतेकर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी सर्वेश करुणाशंकर पांडे उर्फ साजन (28) याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 25 हजार रुपये किंमतीचा पिवळ्या सोनेरी रंगाचा भारतीय बनावटीचे लोखंडी पिस्टल आढळून आल्याने ताब्यात घेतले आहे.







