हुक्काप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील कोन येथील निसर्ग ढाब्याच्या पहिल्या मजल्यावर आलेल्या नागरिकांना हुक्क्यामध्ये तंबाखूयुक्त घटक असलेल्या सुगंधी पदार्थांचे सेवन करण्यासाठी दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

निसर्ग ढाब्याच्या पहिल्या माळ्यावर हुक्का पिण्यासाठी देत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार (दि.17) एप्रिल रोजी निसर्ग ढाबा, कोन गाव या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पहिल्या माळ्यावर हुक्का पार्लरचे मालक धैर्यशील धनंजय नगावडे, मॅनेजर संदेश किशोर डवळे हे त्यांचे वेटर व कामगारांच्या मदतीने धाब्यामध्ये आलेले इसमाना हुक्क्यामध्ये निकोटीन युक्त आणि तंबाखू युक्त घटक असलेल्या सुगंधी पदार्थांचे सेवन करण्यासाठी देत असल्याचे मिळून आले. त्यामुळे धैर्यशील नगावडे, संदेश डवळे मोहोपाडा, राकेश शर्मा, रमाकांत यादव, कुंजबिहारी रामलाल यादव, युवराज भाऊसाहेब शेळके (कोळखे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या ठिकाणाहून काचेचे हुक्का पॉट, विविध डबे जप्त केले.

Exit mobile version