अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, रकुलप्रीत सिंग यांच्यासह 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बलात्कार प्रकरणातील महिलेेचे नाव सोशल मिडियावरु उघड केल्याप्रकरणी देशभरातील 39 सेलिब्रेटीजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेबद्दल व्यक्त होताना पीडितेचं खरं नाव उघड केल्याने 38 सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, रकुलप्रीत सिंग यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, फोटो किंवा खरी ओळख उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकिल गौरव गुलाटी यांनी पीडितेचं नाव उघड करणार्‍या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version