7/8 जण अटकेत तर 10/12 जण फरार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील वाशी परिसरात धमकी देत 17 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्काराची अमानुष घटना घडल्याने खळबह उडाली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर याप्रकरणातील आणखी अंदाजे 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने करायचे बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदीसमारंभात सदर तरुणीची ओळख दोन तरुणांसोबत झाली होती. या ओळखीचे रुपांतर काहीच दिवसात प्रेमात झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनीही धमकावत त्या तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात सुमारे 15 हून अधिक जण सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 ते 8 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर आणखी 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.करणी 7 ते 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर याप्रकरणातील आणखी अंदाजे 10 ते 12 जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. सदर नराधम या युवतीला धमकी देत दररोज आळीपाळीने करायचे बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे.