। पेण । प्रतिनिधी ।
पेण पोलीस ठाण्यात रोटरी क्लब ऑफ ओरायनचे मा. अध्यक्ष सुबोध मुकुंद जोशी (62) यांच्याविरूध्द पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी सुबोध जोशी यांचे पेण चावडी नाका येथे आईस्क्रीम पार्लर आहे. यातील पीडित महिला आईस्क्रीम घेण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली असता आरोपीने दुकानाच्या टेरेसचे काम सुरू आहे ते दाखवण्याच्या बहाण्याने या पिडीत महिलेला टेरेसवर नेले आणि तीच्याशी अंगलट करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हे कृत्य होत असताना महिलेने आपला बचाव करण्याच्यादृष्टीने तेथून पळ काढला आणि याबाबत पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याबाबत पेणच्या महिला दक्षता कमिटीने बघ्याची भूमिका घेतलेली आहे.
या प्रकरणाबाबत पोलीस निरिक्षक संदीप बागुल यांनी सांगितले की, या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असून आरोपीला रीतसर नोटीससुद्धा देण्यात आली आहे. तसेच, या गुन्ह्याबाबत अधिक तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.