| पनवेल | प्रतिनिधी ।
देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद दानिश नौशाद अन्सारी रा. पटेल ज्वेल्स बिल्डिंग, सेक्टर 17 उलवे याच्या विरोधात उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार हे डेली मार्ट समोरील भाजीवाला सद्गुरू चौक, उलवे यांच्याकडे भाजी घेण्यासाठी गेले असताना भाजी विक्रेता मोहम्मद दानिश नौशाद अन्सारी याने हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.







