| पनवेल | वार्ताहर |
घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज चव्हाण हे देवद येथे राहत असून ते काही दिवसांसाठी वडिलांकडे राहायला गेले होते. यावेळी त्यांच्या देवद येथील घरासमोर राहणाऱ्या वाघमारे यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याचे सांगितले. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता घरातील कपाट तोडले असल्याचे दिसून आले. घरात प्रवेश केला असता लॉकर व तिजोरी उचकटून तेथील सामान चोरी झाल्याचे दिसून आले. तसेच एक लाख 26 हजार 310 रुपयांचे दागिने व रोख रकमेची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीच्या घटनेविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे