फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल

। पनवेल । वार्ताहर ।

एका कंपनीविरोधात पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 60 गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनंतर ही फसवणूक समोर आली. खारघर, नेरूळ आणि दहिसर येथील तीन व्यवस्थापकांनी मिळून ही फसवणूक केल्याचे म्हटले आहे. 2022 पासून ते सप्टेंबर 2025 पर्यंत या कंपनीचे कार्यालय खारघर येथे होते. या मूळ कंपन्यांच्या अखत्यारीत इव्हेन्ट, हॉस्पिटीलिटी, इंफ्रा, फाऊंडेशन, आयटी सोल्यूशन, लॉजिस्टिक, व्हेंच्युअर, व्यवसाय मार्गदर्शन सल्लागार, प्रसारमाध्यम या क्षेत्रातील विविध कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या कंपनीचे सादरीकरण दाखवून गुंतवणूकदाराला महिन्याला गुंतवलेल्या रकमेवर 3 टक्के अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीच्या बँक खात्यांवर ठेवींची गुंतवणूक केली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version