| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नावडे येथील वैशाली पवार (21) या महिलेने आत्महत्या केल्या प्रकरणी 28 ऑक्टोबर रोजी पती, सासू-सासरे, नणंद अशा सहा जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार वैशाली राठोड हिचा विवाह 2023 मध्ये बुलढाणा येथील उमेश पवार यांच्यासोबत झाला. ते नावडे गाव येथे भाड्याने राहत होते. वैशालीचे पती उमेश पवार, सासू अरुणा पवार, सासरे रमेश पवार, नणंद सोनू राठोड, नेहा राठोड आणि पती कृष्णा राठोड या सर्वांनी मिळून तिला कार घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये आणण्यास सांगितले. तसेच, तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
