। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका महिलेने आपला हुंड्या करीता छळ केला जात असल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये केल्यानंतर पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पिडीत पतीचे सासरे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.
महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील 24 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारी वरुन पिडीत महिलेला लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने पतीसह सासू, सासरा, मावस सासू, नणंद यांच्याकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जात होता. या रागातून दोन वर्षाची मुलगी ऋतुजा देशमुख हिच्यावर उकळत्या तेलातील चमचा काढून ते तेल अंगावर शिंपडल्याने ती मुलगी गंभीर जखमी झाली. पिडीत महिलेचे वडील नथुराम दत्तात्रय मोरे यांना देखील शिवीगाळ आणि दमदाटी देण्यात आली. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यामध्ये पती सुनिल खंडेराय देशमुख वय 53, सुनिता सुलिल देशमुख वय 50, सिंधुबाई गेनबा पवार, सपना नारायण कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.