महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट घेऊन पीडित महिलेसोबत लग्न करतो असे सांगून अत्याचार करणाऱ्या अजित गोपाळ जोशी (राहणार अक्षर सिल्वर क्रेस्ट, कामोठे) याच्या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अजित गोपाल जोशी यांनी त्याच्या पत्नीसोबत कायदेशीर घटस्फोट घेऊन पीडित फिर्यादी सोबत लग्न करतो आणि फिर्यादींना नवीन घर घेण्यासाठी चार लाख रुपये देईन आणि इतर अनेक खोटी आश्वासने देऊन 2021 ते 2026 दरम्यान त्यांच्यावर अत्याचार केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version