बंद घरातील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

। पनवेल । वार्ताहर ।

बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना कळंबोली रोडपाली येथे घडली आहे. विशाल कदम यांचे कळंबोलीतील रोडपाली येथे सेक्टर 10 ई विनायक आनंद सोसायटी येथे घर आहे. त्यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घर फोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास 5 लाख 17 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version