स्थिर सर्वेक्षण पथकाकडून कारवाई
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल विधानसभा मतदारसंघ निवडणूक विभागांतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकाकडून पुणे ते जुने मुंबई हायवेच्या दिशेने जाणार्या शेडूंग टोलनाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने चारचाकी गाडीची तपासणी केली. यावेळी या गाडीत काळ्या रंगाच्या बॅगमध्ये 1 पिस्टल, 2 मॅगझीन, 12 जिवंत राऊंडसह दोन लाख तेहतीस हजार पाचशे पन्नास रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदरची रक्कम जप्त करुन कोषागार कार्यालय पनवेल येथे जमा करण्यात आली. जप्त करण्यात आलेली अग्नीशस्त्र पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडे पुढील तपास व कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आली.
ही कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील, आचारसंहिता पथक प्रमुख भारत राठोड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कराड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय भालेराव, सहाय्यक खर्च निरीक्षक विजय फासे, सहाय्यक खर्च निरीक्षक संजय आपटे, आचारसंहिता पथक प्रमुख महेश पांढरे, आचार संनियंत्रण अधिकारी शरद गिते, आचारसंहिता पथक सहाय्यक प्रमुख जी.एस. बहिरम, सहा.समन्वयक आचारसंहिता कक्ष, दिनेश भोसले, तुषार म्हात्रे, नितेश चिमणे, आशा डोळस, तसेच स्थिर सर्वेक्षण पथक क्र. 08 पथकाचे प्रमुख किरण भगत, सहा.पथक प्रमुख, देवा केसला, खारघर पोलीस ठाण्याचे पोशी गोपाल चव्हाण, खारघर पोलीस ठाण्याचे पोशी युवराज दिवे उपस्थित होते.