| कोलाड | वार्ताहर |
स्वा. सु.नि. गुरुवर्य अलिबागकर बाबा यांच्या कृपा छत्राखाली गुरुवर्य स्वा. सु. गोपाळबाबा वाजे यांच्या आशीर्वादाने ह.भ.प. ना. ता. दहिंबेकर व वै. ह.भ.प. ना. बा. महाबळे यांच्या संकल्पनेने कार्तिक कृ. चतुर्थी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी संभे ते आळंदी दिंडीचे प्रस्थान संभे येथून सकाळी 8.30 झाले असून, हा सोहळा गुरुवार दि. 28 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
गेली 24 वर्षांपासून हा सोहळा सुरु असून, यावर्षी या पायी दिंडीचे 25 वा रौप्यमहोत्सव वर्षे असून साजरा होत आहे. या पायी दिंडीचे प्रस्थान संभे येथून झाले असून, ती दिंडी सुतारवाडी, विळे, निवे, जामगाव, घोटवडे, पुनवले, मार्गी आळंदी येथे जाणार आहे. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प. ना.ता. दहिंबेकर,(रायगडभूषण), अध्यक्ष तुकाराम बांदल, उपाध्यक्ष अनंत सानप, सेक्रेटरी पांडुरंग सानप, उपसेक्रेटरी गणेश नलावडे, खजिनदार जितेंद्र दहिंबेकर,उपखजिनदार दत्ताराम तेलंगे तसेच दिंडी कार्यकारणी सर्व कमेटी व सर्व सदस्य मेहनत घेत आहेत.