। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे चारजणांनी संगनमताने फिर्यादी यांस जातीवाचक शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांच्या घरातल्यांना धक्का बुक्की केली. नेरळ पोलीस ठाण्यात फिर्यादी रा. शेलु साईबाबा मंदीर आधारवाडी कातकरवाडी ता.कर्जत हे आदीवासी कातकरी समाजाचे असून चारही आरोपीत हे रा.कर्जत हे हिंदु आगरी समाजाचे आहेत. आरोपी यांनी आपसात संगनमत करुन फिर्यादी यांचे घराजवळच्या मोकळया जागेत टिकाव फावडे घेऊन बांधकाम करण्यासाठी आले असता फिर्यादी यांनी तुम्ही काय करता? असा जाब विचारल्याने मनात राग धरुन आरोपींपैकी एकाने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली तसेच फिर्यादीच्या आईला आणि बहिण यांना धक्का बुक्की केली. तसेच फिर्यादी व साक्षीदार हे अनुसुचित जाती जमातीचे आहेत हे माहीत असूनसुदधा आरोपी यांनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली.