। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पिंपळोली ग्रामपरिसरात विनयभंगाचा अपराध करूनही घटनेतील फिर्यादी आणि साक्षीदार यांना अपराध्याने शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार संशयित आरोपीविरूद्ध नेरळ पोलीस ठाण्यात विनयभंग तथा दमटादी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील महिला आरोपीच्या घरासमोरील सार्वजनिक नळयोजना पाणवठ्यावर पाणी भरत असताना आरोपीने वाईट भावनेतून तिच्या पाठीवर हा फिरवला. याकडे कानाडोळा करत दुसर्या नळावर पाणी भरण्यासाठी वळली असता तिच्याकडे तिच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी केली. यावेळी नकारात्मक दुर्लक्ष मिळाल्याने आरोपीने महिलेचा हात पकडला. झाल्याप्रकरणी पिडीतेचे सासरे यांनी जाब विचारला असता आरोपीस राग आल्याने त्याने फिर्यादी आणि साक्षीदार यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यानंतर पिडीतेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस सबइन्सपेक्टर माधुरी मुळीके करीत आहेत.