मांजराच्या खवल्यांची तस्करी करणारा जेरबंद

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
खवले मांजर या संरक्षित प्राण्याच्या खवल्यांची तस्करी करताना दापोली पोलिसांनी मुद्देमालासह एकास अटक केली आहे. तर दुसरा संशयित आरोपी कारवाई दरम्यान दुचाकीवरून पळून गेला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खवले मांजराची खवले बेकायदेशीरपणे स्वतःचे ताब्यात बाळगुन त्याची विक्री करण्यासाठी वाहतुक होत असल्याची खबर दापोली पोलिसांना मिळाली होती. यानुसार, दापोली शहरातील पेट्रोल पंपासमोर चहाच्या टपरी बाजूला ही कारवाई करण्यात आली आहे. खवल्या मांजराचे खवल्यांचे पिशवीसह चार किलो सातशे ग्राम वजनाचे खवले जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी, 21 सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारच्या सुमारास एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास गुन्ह्याचा तपास प्रभारि पोलीस निरीक्षक श्री.ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास पडयाळ हे करीत आहेत.

Exit mobile version