गुरांचा गटारातील कचऱ्यावर ताव

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

सुतारवाडी-कोलाड भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावला आहे. परंतु, येथील रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अशा ठिकाणी पावसाचे तुडुंब पाणी साचले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना रस्ता शोधणे जिकरीचे झाले आहे. तसेच, भिरा फाट्यावर मेघना सिटी इमारती नजीक गटाराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग साचला असून, भर पावसात गुर कचऱ्यावर ताव मारताना दिसत आहेत. गटाराच्या वाहत्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा कचरा टाकला जात असल्यामुळे तेथून पाणी पुढे जाणे अशक्य झाले आहे. हा कचरा पाण्यातच कुजून दुर्गंधी पसरण्याचे दाट शक्यता आहे. कोलाड पासून भिरा फाट्यापर्यंत जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, या खड्ड्यांमध्ये पाणी तुडुंब भरत आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version