| सुतारवाडी | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील रहदारीच्या रस्त्यांच्या मधोमध मोकाट गुरांचा ठिय्या सातत्याने दिसत आहे. हेटवणे, सुतारवाडी, कुडली, नारायणगाव, विळे या ठिकाणी वारंवार मोकाट सोडलेली जनावरे घोळक्याने उभे असतात. आपली जानवरे कोठे आहेत, रात्री घरी का परत आली नाहीत, याची किंचितही काळजी किंवा चिंता गुरे मालकांना नसते. त्यामुळे ही मोकाट जनावरे रात्रंदिवस रस्त्यावर विश्रांती घेत असतात. या मोकाट सोडलेल्या गुरांचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः अवघड कॉइल घेऊन जाणारा ट्रेलर चालकांना खाली उतरून उभ्या असलेल्या किंवा बसलेल्या जनावरांना तेथून हाकलावे लागत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जाणवत आहे. रात्री अपरात्री वाहनचालक या गुरांना कधी उडवून जातो ते कळत सुद्धा नाही. त्यामुळे त्यात गुरांचा मृत्यू होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, असे वाहनचालकांसह स्थानिकांमधून बोलले जात आहे.
सुतारवाडीत मोकाट गुरांचा ठिय्या
