गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

। पेण । प्रतिनिधी।

पेण पोलिसांनी जनावरे पळविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी जनावरांना बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन वाहनातून पळवून न्यायचे. मात्र, पेण पोलिसांनी यशस्वी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश करून एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. पेण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक महिंद्रा झायलो वाहन एक सुझुकि कंपनीची ईको आणि या दोन्ही वाहनांमधील एकूण 4 जनावरे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी आरोपी शफिक रफिक अन्सारी (25), इम्रान मलंग पटेल (36) सलमान अब्दुल अहमद पटेल (36), सोनु जुबेर खान (22), बाजल राशिद शेख (16) यांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. तर तळोजा येथील अजिज शेख हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version