| माणगाव | वार्ताहर |
माणगाव शहरातील कचेरी रोड मार्गावर शनिवारी रात्रीच्या सुमारास आपले औषधाचे दुकान बंद करून आपल्या मोटारसायकलवरून शुभम जैस्वाल (24) आपला सहकारी दीपक यादव (24) रा. माणगाव याच्यासमवेत कचेरी रोड मार्गाने घरी जात असताना, त्यांना पल्सरदिली मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकरी आरोपींना थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर आरोपी मुंबई-गोवा महामार्गावरून इंदापूर बाजूकडे पळून गेले होते. या अज्ञात मारेकरी आरोपींची पल्सर मोटारसायकल (क्र. एम.एच.43-ए.एस.6674) माणगावजवळील एक कि.मी. अंतरावर असणार्या कलमजे पुलाजवळ रस्त्याच्या कडेला सापडल्याची माहिती माणगाव पोलिसांनी दिली. या घटनेत सदरचा तरुण जखमी होऊन त्याला अधिक औषधोपचाराकरिता मुंबईला हलविण्यात आले. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.
या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर.पी. पाटील व त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.