| मुंबई | प्रतिनिधी |
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआय न्यायलायकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणकरांशी संबंधित 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे. फसवणूक प्रकरणाशी संबंधित सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
पुष्पक ग्रुपची एक कंपनी असलेल्या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिडेटनं खरेदी केलेल्या 11 सदनिका ताब्यात घेण्यात आल्या होत्या. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. याआधी ईडीनं पुष्पक बुलियन आणि ग्रुप ऑफ कंपनी विरोधात 6 मार्च 2017 रोजी आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याआधीच ग्रुपच्या मालकीची 21 कोटी 46 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्याात आली होती.