सिबीएससी अभ्यासक्रम शाळा जूनपासून सुरु

। माणगाव । सलीम शेख ।

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे यांनी संस्थेच्या माध्यमातून माणगावात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संस्थेअंतर्गत सिबीएससी अभ्यासक्रमाची शाळा प्ले ग्रुप ते इयत्ता 4 थी पर्यंत दि. 7 जून रोजी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

सिबीएससी अभ्यासक्रमाच्या या शाळेत विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व सर्वांगिक विकासावर भर, आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार शिक्षणाची सोय, विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानावर अधिकाधीक भर, विद्यार्थ्यांच्या वार्षिक आरोग्य तपासणीवर भर, नियमित पालक-शिक्षक बैठक, प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांच्या समक्रमित अभ्यासक्रम हि वैशिष्ट्ये आहेत. तत्पूर्वी दि. 7 जूनपासून या अभ्यासक्रमाची शाळा अशोकदादा साबळे विद्यालय कचेरी रोड माणगाव संकुलात सुरु होणार असून त्यांनतर नवीन इमारत झाल्यावर हि शाळा अमित कॉम्प्लेक्सच्या समोर निजामपूर रोड-माणगाव या ठिकाणी भरणार आहे.

Exit mobile version