पोलीस ठाण्याला सीसीटीव्ही भेट

। रसायनी । वार्ताहर ।

खालापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक कामानिमित्ताने येत असतात. खालापूर बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने या ठिकाणी मद्यपी, टवाळखोर यांचा मुक्त वावर असतो. सकाळी लवकर शाळा महाविद्यालय जाणार्‍या विद्यार्थिनींना तसेच रात्री उशिरा कामावरून सुटल्यानंतर घरी परतणार्‍या महिलांना बस स्थानकात असुरक्षित वाटत असल्याने प्रवासी तसेच बस स्थानकातील व्यापार्‍यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे, अशी मागणी केली होती. यावेळी कळमकर कुटुंबानी त्यांच्या मातोश्री स्व. प्रभावती कळमकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त दिलासा फाऊंडेशन आणि मनोज कळमकर यांनी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सुपूर्द केला आहे. तसेच, हा कॅमेरा बस स्थानकातदेखील बसविण्यात आला आहे.

Exit mobile version