| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील वरदायिनी विद्यालय महागाव माध्यमिक शाळेस इयत्ता 10 वी सन 1995-96 च्या बॅचने 25 हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देणगी स्वरूपात भेट दिले. ही भेट माजी विद्यार्थी सुनिल बयकर, धर्मा राणे, गणेश मानकर, मंगेश महाडिक, नितीन तांबट, तुकाराम कदम, सचिन घाडगे, कुंदन पवार, संतोष कजबले, अरूण मोरे, संदेश कडव, इत्यादींनी सदर भेट शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिली. याचवेळी शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे पत्र देऊन आभार व्यक्त करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महागाव शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता होती. शाळेची ही गरज ओळखून माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे भेट स्वरूपात देण्यात आले. सदर सीसीटीव्ही कॅमेरे दिल्याने शाळेचा परिसर कॅमेऱ्यामध्ये आला असून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला यामुळे आधार मिळाला आहे.







