| उरण | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत यांचा 50 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी इंदिरानगर झोपडपट्टी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. लायन्स क्लबच्या माध्यमातून झालेल्या या शिबिराचा फायदा सर्वसामान्यांना झाला. याशिवाय ब्लँकेटचे वाटप, स्वीकार शाळेतील मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, घरकाम करणार्या 50 महिलांचा सत्कार, नाईकनगर झोपडपट्टी येथे अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमात शेकापचे ज्येष्ठ नेते काका पाटील, तालुका चिटणीस विकास घरत, नरेश घरत, शहर चिटणीस शेखर पाटील, महादेव बंडा,नरेश रहाळकर, दत्ता घरत, संदीप म्हात्रे, अनंत घरत, लायन्सचे पदाधिकारी अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर व स्टाफ, विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिक यानी सीमा घरत याना शुभेच्छा दिल्या.