। आगरदांडा । प्रतिनिधी ।
समुद्राकाठी राहाणार्या व प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा नारळीपौणिमा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधवासह शहरातील नागरिकांच्यावतीने सजवलेल्या सोन्याच्या नारळाची पुजा करून भव्य मिरवणूक लक्ष्मीखार येथील बापदेव मंदिरापासून समुद्रकिनारा पर्यंत काढण्यात आली. तद्नंतर सोन्याच्या नाराळाची पुजन व आरती करुन दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी मुरुड शहरात व कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत होते.
यावेळी अविनाश दांडेकर, प्रमोद भायदे, महेश भगत, संदिप पाटील, प्रकाश राजपुरकर, किर्ती शहा, रूपेश जामकर, विजय सुर्वे, पांडुरंग आरेकर, मंगेश दांडेकर, मोहन करंदेकर, अरविंद गायकर, प्रविण बैकर, आदेश दांडेकर, अच्युत पोतदार, निलेश राजपुरकर, दिपक राजपुरकर, नयन कर्णिक, अशोक कमाने, अजित गुरव आदिंसह समाज पाखाडी अध्यक्ष व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पारंपारिक पद्धतीने नारळीपौर्णिमा साजरी

Exif_JPEG_420