म्हसळ्यात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

। म्हसळा । वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक महाविद्यालयात व तहसील कार्यालय म्हसळा येथे तहसीलदार समीर घारे यांचे प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी दि.24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने तहसीलदार समीर घारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ग्राहकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यात पुरोगामी आणि व्यापक असा कायदा आहे. असे सांगताना एखाद्या मालाची विक्री चढत्या भावाने होत असेल किंवा मालावर दर्शविलेल्या किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री होत असेल तर जिल्हा पातळीवर ग्राहक तंटा निवारण यांच्याकडे तक्रार करणे आवश्यक आहे तसेच एखादे वस्तूची खरेदी करताना कर पावती घेणे आवश्यक आहे. तसेच फसव्या व भुलविणार्‍या जाहिराती, ऑनलाइन खरेदी मधील वस्तूंमध्ये होत असलेली फसवणूक याबाबत ग्राहकांनी दक्ष राहिले पाहिजे असे तहसीलदार समीर घारे यांनी सांगून उपस्थित सर्वांना राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सदर कार्यक्रमास तहसीलदार समीर घारे यांसह महाविद्यालयातील प्राचार्य एम एस जाधव, प्रा.शिरीष समेळ, प्रा.के.भोसले, प्रा.एस बेंद्रे, प्रा.एम सिद्दीकी, प्रा.एस.डुंडे, प्रा.सुमित चव्हाण, प्रभारी गोदामपाल गणेश महाडिक यांसह विद्यार्थी उपस्थित होते. तसेच तहसीलदार कार्यालयात देखील राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

Exit mobile version