। म्हसळा । वार्ताहर ।
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापनदिन म्हसळा तालुक्यात शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, कॉलेजमध्ये मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करून ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संबंधीत कार्यालयातील मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रामुख्याने म्हसळा प्राथमिक शाळेत पालक शिक्षक समिती अध्यक्ष मानसी बनकर, न्यु इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन समीर बनकर, वसंतराव नाईक कॉलेज मध्ये चेअरमन फझल हलदे, सार्वजनिक वाचनालयाचे महिला कर्मचारी सायली चोगले, म्हसळा नगर पंचयतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, म्हसळा पंचायत समितीचे सभापती छाया म्हात्रे, जिजामाता शिक्षण संस्थेचे माजी सभापती महादेव पाटील, म्हसळा तालुक्यातील शासकीय मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात तहसीलदार समीर घारे यांचे हस्ते संपन्न झाला. निटनेटक्या छोटेखानी कार्यक्रमात तालुका लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, लहान थोर भारतीय नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला म्हसळा पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे आणि त्यांचे पोलिस पथकाने सलामी दिली. सर्वच कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर व नागरिकांनी भारतीय संविधान आणि देशनिष्ठेची सामूहिक शपथ घेतली.