। अलिबाग । वार्ताहर ।
पीएनपीचे विशेष कार्यकारी अधिकारी, होली चाईल्ड स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय मिर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी बी.एड कॉलेजचे प्राचार्य नितेश मोरे, कॉलेजचे प्रभारी उपप्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, मुख्याध्यापिका रसना व्यास आणि इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.