नवरात्रोत्सव शांततेने साजरा करा

बाळा कुंभार यांचे पोलीस पाटलांना मार्गदर्शन

| पाताळगंगा | वार्ताहर |

नवरात्र उत्सव शांततेत पार पवा यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करावेत, असे आवाहन खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या पोलीस पाटील यांना केले. नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मूर्ती विटंबना होणार नाही यासाठी 24 तास स्वयंसेवक नेमण्यात यावेत. तसेच मंडप मजबूत असावे, मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, कायदेशीर विद्युत जोडणी असावी, ऑनलाइन परवानगी अर्ज करावा, तसेच संबंधित विभागाच्या परवानगी घ्यावी, गरबा दांडिया खेळताना सदर ठिकाणी मुलींची छेडछाड, विनयभंग, चोरी, मद्य प्राशन करून गरबा खेळणे यासारखे प्रकार होणार नाहीत. याबाबत मंडळानी दक्षता घ्यावी, अशा विविध सूचना दिल्या.

Exit mobile version