| पाताळगंगा | वार्ताहर |
नवरात्र उत्सव हा सार्वजनिक असल्यामुळे मोठ्या उत्सहाने साजरा होत असला तरीसुद्धा या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील पोलीस पाटील यांना नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबतच्या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांची माहिती देण्यात आली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, मूर्ती विटंबना होणार नाही, यासाठी 24 तास स्वयंसेवक नेमण्यात यावेत. तसेच मंडप मजबूत असावे, मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, कायदेशीर विद्युत जोडणी असावी, ऑनलाइन परवानगी अर्ज करावा, तसेच संबंधित विभागाच्या परवानगी घ्यावी, गरबा दांडिया खेळताना सदर ठिकाणी मुलींची छेडछाड, विनयभंग, चोरी, मद्य प्राशन करून गरबा खेळणे, नवरात्रौत्सवामध्ये जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणारे बॅनर, देखावे, चित्रफिती प्रसारित करू नये.याबाबत मंडळानी दक्षता घ्यावी, तसेच स्वयंसेवक नेमवावे, अशा सूचना केल्या.