| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
दै.कृषीवलचा 86 वा वर्धापन दिन मंगळवारी साधेपणाने कर्मचारी आणि वार्ताहर, वितरक आदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हॉटेल मॅपेल आयवी येथे मुख्य संपादक राजेंद्र साठे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार प्रा.आनंद जोशी, बी.एस.कुलकर्णी, संतोष पाटील, डिजिटल आवृत्ती संपादिका माधवी सावंत, मुख्य व्यवस्थापक रुपेश पाटील, जाहिरात व्यवस्थापिका हर्षा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी परस्परांशी संवाद साधण्यात आला. शिवाय भविष्यातील वाटचालीवर चर्चाही करण्यात आली. कृषीवलचा गौरव करताना प्रा. आनंद जोशी म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील दर्जेदार दैनिक असा दबदबा निर्माण केला आहे. वाचकांना हवे ते देण्याचे कसब कृषीवलने पुर्ण करुन दाखवले आहे. संतोष पाटील यांनी देखील कृषीवलचे कौतुक करीत जिल्ह्यातील वाचकांचे लोकप्रिय दैनिक म्हणून काम करताना अन्यायावर प्रहार आणि दीन दुबळ्यांचा आधार बनून कृषीवलने आपला बाणा कामय ठेवला.

बी एस कुलकर्णी यांनी प्रत्येक बातमीची दखल घेणार्या कृषीवलने जुन्या वार्ताहरांना देखील कायम आदर दिला आहे. प्रकाश म्हात्रे, दीपक पाटील, जीवन पाटील, जसपाल नाओल, संतोष पेरणे तर वितरकांतर्फे राजेंद्र मेहता, राजेंद्र जोशी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. वितरक, पत्रकारांच्यावतीने अनेकांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांना राजेंद्र साठे, माधवी सावंत, जाहिरात विभागाचे सचिन गुप्ता यांनी समर्पक माहिती दिली. यावेळी राकेश खराडे, गणेश चोडणेकर, राजेश डांगळे, प्रदीप मोकल, विजय चवरकर, अनिल गवळे, संतोष रांजणकर, राजीव नेवासेकर, समीर रिसबुड, सचिन नेरपगार, अजिंक्य कर्वे, राजेंद्र जोशी, भरतकुमार कांबळे, संतोषी म्हात्रे, सत्यप्रसाद आडाव आदी उपस्थित होते.

शेवटी प्रकाश म्हात्रे यांनी पहाडी आवाजात गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली. आनंद जोशी, अतुल गुळवणी यांनीही विविध गीते सादर केली. अलिबागचे विशेष प्रतिनिधी भारत रांजणकर यांनी आभार मानले.






